बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: मागील दोन दिवसांपासून 6 ते 8 किलो सोने घेऊन नोकर पळून गेल्याची चर्चा बार्शी शहरात सुरु होती. त्याला शुक्रवारी बार्शी पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीवरुन खरेच सोने घेऊन नोकर फरार झाल्याचे स्पष्ट होत आहे. बार्शी येथील प्रसिध्द सोन्याचे होलसेलमध्ये सोन्याचा व्यापार करणारे व सोन्याचे गाळप करणारे व्यापारी नंदू पाटील यांच्या दुकानातील कामगार भरत उर्फ रवि नारायण यादव याने 31 लाख 18 हजार 750 रुपये किमतीचे 112.5 तोळे साने व रोख 2 लाख रुपये घेऊन फरार झाल्याची तक्रार खर्डा (ता. जामखेड) येथील सोन्याचे व्यापारी अविनाश जवाहरलाल शहा यांनी बार्शी पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश जवाहरलाल शहा यांचे खर्डा (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे रामचंद्र साकळचंद् शहा नावाचे सोन्याचे दुकान आहे. बार्शीतील नंदू पाटील यांच्या रिफायनरी मध्ये सोन्याचे गाळप करण्यासाठी ते नेहमी येतात. दि. 6 मे रोजी दुपारी नेहमीप्रमाणे सोने गाळप करण्यासाठी आल्यावर 65 तोळे सोने पिशवीत आणले व नंदू पाटील यांचा नोकरी भरत उर्फ नारायण यादव याच्याकडे दिले. मित्र मुकेश अणवेकर यांच्या मुलाची मुंज असल्याने कार्यक्रमाला जाऊन येतो, असे सांगून शहा तिकडे गेले. दुपारी चारच्या दरम्यान परत आल्यावर ज्याच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची पिशवी दिली तो नोकर नसल्याचे समजले व दुसरा नोकर मोहन याने शहा यांना पिशवी दिली. पिशवीत न पाहता शहा श्रीनिवास अणवेकर यांच्या शिवनाथ ज्वेलर्स दागिने नसल्याचे सांगितले. त्यावेळी दुसरा नोकर याने पहिला नोकर भरत उर्फ नारायण यादव हा कुठे आहे, हे माहित नसल्याचे सांगितले व त्याचा मोबाईल नंबर दिला, त्या नंबरवर कसलाही संपर्क झाला नाही. दुस-या दिवशी पुन्हा चौकशी करण्यासाठी आल्यावर नंदू पाटील यांनी आपल्याही दुकानातील विक्रीचे सोने, ग्राहकांचे गहाण सोने व रोख 2 लाख रुपये घेऊन नोकर फरार झाल्याचे सांगितले.
सदरच्या प्रकारानंतर दोघा व्यापा-यांचा विश्वासघात करुन नोकर भरत यादव हा शहा यांचे 17 लाख 87 हजार 500 रुपये किमतीचे 65 तोळे सोने तर नंदू पाटील यांचे 13 लाख 31 हजार 250 रुपये कितीचे 47.5 तोळे सोन व रोख 2 लाख रुपये असे एकूण 31 लाख 18 हजार 750 रुपये रुपये किमतीचे 112.5 तोळे सोने व रोख 2 लाख रुपये घेऊन फरार झाल्याची तक्रार अविनाश शहा यांनी बार्शी पोलिसात दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन भा.दं.वि. 406 नुसार गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद घोडके हे करीत आहेत.