उस्मानाबाद  -: राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एक दिवसाच्या उस्मानाबाद दौ-यावर येत असून त्यांचा दौ-याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
    शनिवार,दि.11 मे रोजी दुपारी 12-10 वाजता पुणे येथून उस्मानाबाद विमानतळ हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे  प्रयाण.दुपारी 12-30 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन.दु. 12-30 ते 1 या वेळात शिष्टमंडळासाठी राखीव. दु.1-25 वा. शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने जिल्हा नियोजन समिती सभागृहाकडे प्रयाण. दु. 1-30 वा. आढावा बैठक. दु.2-30 वा. पत्रकार परिषद. दु.3 वा.  जिल्हा नियोजन समिती सभागृह येथून नगर पालिका समोरील मैदानाकडे प्रयाण. दु.3-10 वा. कार्यक्रम स्थळ येथे आगमन. दु.3-15 वा. जलपूजन कार्यक्रम.  दु.4-15 वा. नगर पालिकासमोरील मैदान येथून मोटारीने उस्मानाबाद विमानतळाकडे प्रयाण. सायं.4-30 वा. उस्मानाबाद विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पाषाण,पुणेकडे प्रयाण. सायंकाळी 5-45 वाजता पाषाण हेलिपॅड पुणे येथे आगमन व राखीव.
         सायंकाळी 5-50 वा. पाषाण हेलिपॅड,पुणे येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.
 
Top