नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) येथील केंद्रातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शुक्रवारी रोजी पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव नरे तर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माणिक आलुरे, निवृत्त मुख्याध्यापक भोगोजी घुगे, केंद्रप्रमुख दगडू सालेगावे आदीजणांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून परिसरातील सर्व बालकांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्याची काळजी घेणे, शाळेचे कामकाज अधिक चांगल्या दृष्टीने होण्यासाठी शिक्षक अपेक्षित कर्तव्य पार पाडतात की नाही याचा पाठपुरावा करुन याबाबतची अडीअडचणी सोडविण्याची जबाबदारी समितीची असल्याचे महादेव नरे यांनी सांगितले.
शिक्षक हक्क कायदा 2009, पटनोंदणी उपस्थिती, शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्ये व सर्व शिक्षा अभियानातील विद्यार्थी लाभाच्या योजनांची माहिती, मध्यान्ह भोजन व इतर शासकीय योजनांच्या माहितीबरोबर हत्या, किडनॅपिंग, रँगिंग, लैंगिक छळ, शोषण, बालकामगार कायद्याची माहिती केंद्रप्रमुख दगडू सालेगावे यांनी दिली.
परशुराम कानडे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर अशोक लोहार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिक्षण शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. शिबिरात बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण, हक्क व कायद्याविषयी माहिती देण्यात आली. वत्सलानगर देशमुख वस्ती, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (मुलांची), कन्या शाळा या ठिकाणचे व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, नवल गोवे, बाबुराव चव्हाण, काशिनाथ देडे हे उपस्थित होते.