नळदुर्ग -: वागदरी (ता. तुळजापूर) येथे पाणी टंचाईवर मात करण्‍यासाठी दोन हजार लिटर क्षमतेच्‍या पाण्‍याची टाकी रचनात्‍मक संघर्ष समितीच्‍यावतीने देण्‍यात आले आहे. त्‍या टाकीचा लोकार्पण सोहळा उत्‍साहने संपन्‍न झाला.
    रचनात्‍मक संघर्ष समिती ही गेल्‍या पाच-सहा वर्षापासून विविध सामाजिक प्रश्‍नावर या परिसरात काम करत असून सध्‍या निर्माण झालेल्‍या तीव्र पाणीटंचाईवर व दुष्‍काळी परिस्थितीवर मात करण्‍यासाठी काय उपाय योजना करावे, या विषयावर जनमाणसात जावून रचनात्‍मक संघर्ष समिती काम करीत आहे. गावात उपलब्‍ध आहे ते पाणी काटकसरीने वापरुन पाणीटंचाईवर मात करण्‍यासाठी रचनात्‍मक संघर्ष समितीच्‍यावतीने वागदरी (ता. तुळजापूर) ग्रामपंचायतीला दोन हजार लिटर क्षमता असलेली सिनटेक्‍स पाण्‍याची टाकी देण्‍यात आली आहे.  पाण्‍याच्‍या टाकीचा लोकार्पण सोहळा गावचे सरपंच राजकुमार पवार यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाला. यावेळी ह.भ.प. राजकुमार पाटील, आनंद धुमाळ, कृषी सहाय्यक धनराज बिराजदार, महादेव बिराजदार, सुकसिंग ठाकूर, ग्रापंचायत सदस्‍या कविता गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, वसंत वाघमारे, एस.के. गायकवाड, नागनाथ सुरवसे, पांडुरंग मिटकर, रावण पवार, अमोल पवार, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, उज्‍वला वाघमारे यांच्‍यासह ग्रामस्‍थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक युवा जनशक्‍तीचे प्रमुख मुकेश सोनकांबळे यांनी तर सुत्रसंचालन धनराज आडगळे यांनी केले व आभार जयश्री बिराजदार यांनी मानले.
 
Top