भूम -: पारगाव (ता. भूम) येथील पत्रकाराला मारहाण करण्यात आली. या प्रकाराचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुका शाखेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणी तहसीलदारांना निवेदन देऊन पत्रकारांना संरक्षण देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    नायब तहसीलदार एस. एस. कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पारगाव येथील काहीजणांनी विरोधात बातम्या छापल्याचा राग मनात धरून पत्रकार विकास तळेकर यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी वाशी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुख्य आरोपीला वगळून अन्य लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपीवरही गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी व पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी तत्काळ कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकुंद लगाडे, दत्ता आहिरे, शंकर खामकर, विश्वनाथ फल्ले, अशोक वनवे, औदुंबर जाधव आदींच्या सह्या आहेत.
 
Top