नळदुर्ग -: फुले-शाहू-आंबेडकर या महामानवांच्‍या विचारांचा आदर्श घेऊन कार्यकर्त्‍यांनी विकासात्‍मक दृष्‍टीकोन समोर ठेवून सामाजिक कार्यात सक्रीय झाले पाहिजे, असे प्रतिपादन उस्‍मानाबाद जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य हरीष डावरे यांनी नळदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
    तथागत महात्‍मा गौतम बुध्‍द जयंतीदिनी नळदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात हरीष डावरे हे प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलताना पुढे म्‍हणाले की, सध्‍या नवीन नवीन प्रश्‍न निर्माण होत आहेत. नव्‍या स्‍वरुपात जातीवाद वाढत आहे. मागासवर्गीयांना शासनाच्‍या योजनापासून वंचित ठेवण्‍याची व्‍यवस्‍था निर्माण केली जात आहे. कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंगेस सरकार मागासवर्गीयांचे व महिलांचे संरक्षण करण्‍यास असमर्थ आहे. तेव्‍हा फूले-शाहू-आंबेडकर चळवळीत काम करणा-या कार्यकर्त्‍यांनी सतर्क राहून आपला व पर्यायाने समाजाचा विकास करण्‍याचा प्रयत्‍न करावा.
    याप्रसंगी बौध्‍द विहार मंडळाचे अध्‍यक्ष प्रा. शिवाजी बनसोडे, परिवर्तन संस्‍थेचे सचिव मारुती बनसोडे यांच्‍या हस्‍ते जि.प. सदस्‍य हरीष डावरे यांचा यथोचित सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी प्रकाश गायकवाड, सुधाकर सोनकांबळे यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सूत्रसंचालन रिपाइंचे तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड यांनी केले.
 
Top