नळदुर्ग -: येथील नगरपालिकेच्‍या उपनगराध्‍यक्षपदी सौ. अपर्णा अरविंद बेडगे यांची बिनविरोध निवड झाल्‍याबद्दल त्‍यांचा मराठा गल्‍ली येथील महिलांनी शाल, श्रीफळ व पुष्‍पहार देऊन सत्‍कार केला.
    मराठा गल्ली येथील महिलांनी उपनगराध्‍यक्षा अपर्णा बेडगे यांचा सत्‍कार केला. या कार्यक्रमास तुळजापूर तालुका दक्षता समितीच्‍या सदस्‍या शाहेदाबी सय्यद, कल्‍पना गायकवाड, प्रिती येडगे, महिला बचत गटाच्‍या निर्मला काळे, सुधामती सावंत, कांताबाई जगताप, सुमन ढोकळे आदीजण उपस्थित होत्‍या.
    यावेळी सत्‍काराला उत्‍तर देताना उपनगराध्‍यक्षा अपर्णा बेडगे म्‍हणाल्‍या की, नगरपालिकेच्‍या माध्‍यमातून सर्व नळदुर्गवासियांना मुलभूत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यास आपण प्रयत्‍नशील असून महिलांच्‍या अडीअडचणी सोडविण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न करणार आहे. मराठा गल्‍ली येथील गेल्‍या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्‍या स्‍वच्‍छतागृहाचा प्रश्‍न सोडविणार असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले. या कार्यक्रमास महिला उपस्थित होत्‍या.
 
Top