बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: मागील अनेक दिवसांपासून बार्शी शहरात चो-या व दरोडे टाकणा-या आरोपींना तत्कालीन पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांनी सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना पकडून न्यायालयासमोर हजर केले. त्यांना न्यायदंडाधिकारी ए.एम. फडतरे यांनी केवळ सहाच महिन्यांत आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
दि. 21 व 25 जुलै 2012 रोजी शहरातील विविध ठिकाणी दरोडे, घरफोडे, चोरी इत्यादी घटना घडल्या. यातील आरोपी दत्या काळे व चिन्या शिंदे यांना तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. घरफोडी व चो-यांमध्ये सापडलेला मुद्देमालासह पंचाच्या साक्षी पुरावे व सरकारी वकील श्रीमती बळी यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने मान्य करुन अवघ्या सहा महिन्यात दोघांना आठ महिने कारावसाची शिक्षा सुनावली.