बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: 'तुळजापूर लाईव्ह' ऑनलाईन ई-न्यूज पेपरवर दि. 24 एप्रिल रोजी 'पिण्याच्या पाण्यावर ऊसाची शेती' या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या वृत्ताने उशीरा का होईना प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याप्रकरणी बार्शी-कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने कुर्डुवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीत 4 ठिकाणहून पाण्याची गळती केली जात असल्याची तक्रार जलदाय अभियंता होनखांबे यांनी कुर्डुवाडी पोलिसात दिल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सभापती देविदास शेटे यांनी दिली.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चिंचगाव टेकडीजवळ असलेल्या उंच वॉल्व्ह नादुरूस्त करुन यामधून उबाळे हे त्यांच्या शेतात पाणी घेतात तसेच सदरच्या वॉल्व्हची दुरूस्ती केली तरी पुन्हा फोडतात व त्यांनी जेसीबी लावून चारी घेतली आहे. पापनस येथील विसावा हॉटेलजवळ एअर वॉल्व्ह दि. 9 मे च्या रात्री अकरा वाजता फोडून तेथील कांबळे वस्तीमध्ये असलेल्या शेततळे भरण्यासाठी घेतले. पापनसमध्ये माढा रोडजवळ बार्शीच्या बाजूने असलेल्या लोखंडी पाईपलाईनवरचा व्हॉल्व्ह वारंवार फोडून सीना नदीत मोटर बसवून शेतकरी पाणी घेतात. आरडा नाला येथील वॉश आऊट ओपन करुन जवळ विहीरी घेतलेल्या शेतक-यांनी मोटार बसवून रात्री विहीरीत पाणी घेतले व शेतीसाठी वापरले आहे.
मागील अनेक दिवसांपासून शहरातील केला जाणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. बार्शी शहराला दररोज केला जाणारा पाणीपुरवठा मागण्या अनेक महिन्यांपासून बार्शी नगरपरिषदेने एक दिवसाआड केला होता. परंतु एक दिवसाआडदेखील पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने बार्शी शहरात पाण्याचे कृत्रिम संकट वारंवार सुरु झाल्याने त्याचे नेमके कारण काय याची तपासणी केल्यावर या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनवर अनेकांनी आपल्या बळाचा वापर करुन शेतीसाठी अथवा इतर कारणासाठी वापर केल्याचे उघड झाले होते. दुष्काळाच्या परिस्थितीतही पाण्याचा गैरवापर होत असूनही नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक होती. कुर्डुवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीने नगरपरिषदेने आपले कर्तव्ह बजावले आहे. पोलीसही आपले कर्तव्य बजावतील.