बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील शिवराज्‍य सेनेच्‍या नूतन पदाधिका-यांची निवड करण्‍यात आली असून अध्‍यक्षपदी श्रेयस परदेशी, उपाध्‍यक्षपदी आनंद माने तर प्रसिध्‍दीप्रमुख म्‍हणून उमेश काळे यांची निवड करण्‍यात आली आहे.
    शंभुराजे जन्‍मोत्‍सव 2013 प्रथेप्रमाणे साजरा करण्‍यात येणार असून छत्रपती संभाजीराजे यांच्‍या जयंतीनिमित्‍त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. दि. 14 मे रोजी महाराष्‍ट्रातील विविध लोकसंस्‍कृतीचे दर्शन व इतिहासाचे साक्षात्‍कार घडविणा-या जागर माय मराठीचा या मराठमोळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    यापूर्वी मोफत सर्वरोग निदान शिबीर, मोफत औषधांचे वाटप हे कार्यक्रम राबविण्‍यात आले आहे. सध्‍या मोतीबिंदू चिकित्‍सा व ऑपरेशन उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन शिवराज्‍य सेनेने केले आहे.
 
Top