बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अनेक दिवसांपासून बार्शी तहसिल, मोहोळ तहसिलमधील काही कर्मचा-यांच्या अर्थपूर्ण वाटाघाटीतून सुरु असलेल्या वाळूमाफियांचा गोरख धंद्याला अखेर जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी स्वतःच्या जीवावर उदार होत कारवाई केली.
मंगळवार रोजी रात्री सव्वा नऊ वाजता जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी यातील आरोपीना चार ट्रकमधून वाळूची तस्करी करताना रंगेहाथ पकडले. यात एम.एच 45 - 6555, एमएच 11 ए.सी. 7167, एम.एच. 13 ए.एक्स. 2113, एम.एच. 12 ई.एफ. 0217 या क्रमाकांचे ट्रक आहेत. मिडी (ता. मोहोळ) येथील बेगमपूर वाळूचा उपसा करुन अविराज इंडिकेम प्रा.लि., साठा क्रमांक सहा मधून वाळू घेऊन आरोपींनी गुन्हा केला आहे. यावेळी परवान्यापेक्षा जास्त वाळू चोरी करुन पावत्यांमध्ये खाडाखोड केल्याचे, बनावट दस्ताऐवज तयार केल्याचा गुन्हा उघड झाला आह. भा.पर्या.कायदा क्र. 9 व 15 नुसार त्यांच्यावर कारवात आली असून अद्यापपर्यंत यातील 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरच्या कारवाई वेळी गावकामगार तलाठी सज्जा तडवळे तुकाराम पांडुरंग माने, बार्शीचे शांतराम सांगडे, मोहोळचे तहसिलदार पांडुरंग पडदुणे, वैराग पोलिसांचे पथक पाचारण करण्यात आले. 'मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन' म्हणून अनेक दिवसांपासून दोन नंबरची कमाई करुन धनदांडगे झालेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चोर व दरोडेखोरांवर आपल्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढून कारवाई लागली ही स्थानिक अधिका-यांच्या दृष्टीने शरमेची गोष्ट आहे. बेईमानी करत चोरांची पाठराखण करुन घरचा प्रपंच चालू ठेवणा-या अधिका-यांना सर्वसामान्यांच्या दट्टयामुळे उघडे करण्यात आले आहे. परवान्यापेक्षा जास्त वाळू वाहतुक करणे, वाळूची चोरी करणे, पर्यावरणाचा समतोल बिघडवणे, पावत्यांमध्ये खाडाखोड करणे, बनावट दस्ताऐवज तयार करणे, लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणे, धमकावणे, रस्ते खराब करणे, दहशत माजवणे इत्यादी प्रकारच्या कारवायात हे गुंड माहीर आहेत.
गुन्ह्यातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे : पानगाव (ता. बार्शी) येथील कैलास लिंबाजी ताटे, दत्तात्रय मच्छिंद्र नलावडे, अमोल शिवाजी जाधव, मोहन रावसाहेब काळे, दत्ता वसंत गुजले, विकास अभिमान सगरे, रणजित काकासाहेब रणसिंग, रमेश वसंत सुरवसे, बार्शीतील रवि देवकर, प्रशांत सर्जेराव देशमुख, सायबू सिरबा जाधव, बावी येथील नाना अरुण डोईफोडे असे आरोपीचे नावे आहेत. सदरच्या गुन्ह्याचा तपास फौजिदार अनिल गोडसे हे करीत आहेत. यातील प्रमुख आरोपी ठेकेदार अजिसिंह साचकर हा चार गुन्ह्यातील वॉंटेड असून फरार झाला आहे.