नळदुर्ग -: चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील ग्रामदैवत व परिसरात सुप्रसिध्द असलेले श्री भैरवनाथ देवस्थानाची यात्रा सोमवार दि. 6 मे रोजीपासून विविध कार्यक्रमाने साजरी होत आहे. श्री भैरवनाथ देवस्थान हे चिकुंद्रा व परिसरातील भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असून या देवस्थानाची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चैत्र व द्वादशी (12) सोमवार दि. 6 मे रोजी मोठ्या उत्साहात होत असून यानिमित्ताने विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या तत्वपूर्वी दि. 5 मे रोजी एकादशी दिवशी रात्री सात वाजता बालकिर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर पठाडे महाराज यांचे भजन, किर्तन व गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर दि. 6 मे रोजी पहाटे चार ते सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान श्री भैरवनाथाचा महाभिषेक होवून यात्रेस प्रारंभ होतो. याच दिवशी खीर रुपाने भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. यानंतर रात्री साडे आठ वाजता 'श्री' चा घोड्यावर ''भैरोबाचं चांगभलं' असा गजर करुन चौघडा वाजवून काठी नाचवित गुलालाची उधळण करुन छबीना काढण्यात येणार आहे. मंदिराच्या भोवतीने पाच प्रदिक्षणा घातल्या जातात. यावेळी आकर्षक आतिषबाजी व मिरवणुकीतील खोब-याची उधळण आणि जयघोषाने चिकुंद्रा व परिसर दुमदुमून जातो. दुस-या दिवशी दि. 7 मे रोजी चार वाजता भव्य जंगी कुस्त्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचदिवशी यात्री साडे सात वाजा भाग्यश्री प्रॉडक्ट सोलापूरचा मनोरंजनात्मक 'लावण्यखणी' या बहारदार नृत्य गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या यात्रेचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, यात्रा कमिटीचे पदाधिकारी, तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले आहे.