.jpg)
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात त्यांनी आज टंचाई परिस्थिती आढावा बैठक घेतली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, महापौर अलका राठोड, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, महापालिका आयुक्त अजय सावरीकर उपस्थित होते.
बैठकीत सूचना देताना उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सध्या दुष्काळाची तीव्रता खुप वाढली आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर्स भरले जातात त्या स्त्रोताच्या ठिकाणी सध्या 16 तास वीजपुरवठा चालू आहे. परंतू पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन पुढील दीड महिन्याच्या कालावधीपर्यंत अक्कलकोट येथील पाणी स्त्रोतांसह इतर ठिकाणी वीजपुरवठा 24 तास करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिल्या.
चारा छावण्यांच्या पैश्यांमध्ये अर्धा टक्का खर्च प्रशासकीय कामासाठी ठेवण्याच्या तरतूदीबाबत आदेश लवकरच निर्गमित केले जातील. तसेच जिल्ह्यातील चारा डेपो देय असलेले 8.50 कोटी रुपये त्वरित देण्याबाबत संबंधित सचिवांना सूचना दिल्याचे सांगितले. दुष्काळाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची मान्यता घेऊन जिल्हा नियोजन निधीतून दुष्काळाची कामे तातडीने सुरु करावीत. प्रत्येक तहसीलदारांकडे पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त दोन -तीन टँकर्स ठेवण्यात यावीत याबाबत तक्रारी येवू नयेत याची दक्षता घ्यावी. टँकरला जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांची दिल्या.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी दुष्काळी कामांबाबत जिल्हाधिका-यांना विचारुन व जिल्हा निबंधकांच्या परवानगीने खर्च करावा. ट्रीपल आर निधीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून जिल्हाधिका-यांनी तशा प्रकारची नोट केंद्रीय कृषी मंत्र्यांना पाठविण्याच्या सूचना दिल्या.
धरणातून पाणी सोडणे आणि सीना कोळेगांव प्रकल्पातून डाव्या उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याबाबत विविध लोकप्रतिनिधींनी मागणी केली याबाबत शासनाने सर्व अधिकार जिल्हाधिका-यांना दिले आहे. वस्तुस्थिती पाहून जिल्हाधिका-यांनी निर्णय घेण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.
यावेळी सोलापूर लेबर सोसायटीकडून उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याच्या टाक्या जिल्हा प्रशासनास देण्यात आल्या.
बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी दुष्काळी नियोजनाची माहिती उपमुख्यमंत्र्यांना देऊन चारा डेपोच्या उर्वरित साडेआठ कोटी रुपये बिलाची रक्कम त्वरीत देण्याची मागणी केली. बैठकीस सर्वश्री आमदार गणपतराव देशमुख, दिलीप सोपल, बबन शिंदे, दिलीप माने, भारत भालके, श्यामल बागल, प्रणिती शिंदे, हनुमंत डोळस, सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.