उस्मानाबाद -: यंदाच्या खरीप हंगामातील निविष्ठा उपलब्धता आणि निविष्ठांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीसाठी जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी कार्यालयात व तालुकास्तरावर गट विकास अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मदनलाल मिणीयार यांनी कळविले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा कक्ष कार्यानिवत असेल.
शेतक-यांना कृषी निविष्ठा (खते, बियाणे व कीटकनाशके) विषयी असलेल्या अडचणी –तक्रारी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शनासाठी या कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, कृषी विभागाच्या १८०० २३३ ४००० या टोल फ्री क्रमांकावरही शेतक-यांना आपल्या तक्रारीसाठी संपर्क करता येईल.
जिल्ह्यातील तक्रार निवारण कक्षाचे ठिकाण व त्याचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे- कृषी विकास अधिकारी, जि.प. उस्मानाबाद- ०२४७२-२२३७९४, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद- ०२४७२-२२२१५७, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, उमरगा- ०२४७५-२५२०२७, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, लोहारा- ०२४७५-२६६५७९, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, तुळजापूर - ०२४७१-२४२०४०, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, भूम- ०२४७८-२७२०२८, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, परंडा- ०२४७७-२३२०२८, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, वाशी- ०२४७८-२७६९००, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, कळंब- ०२४७३-२६२२२५.