उस्मानाबाद -: बदलल्या पावसाच्या लहरीपणास मात करण्यासाठी गावागावात तुषार व ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. यापुढे नियोजन करतांना पाण्याचा थेंब ना थेंब शेतीतच जिरवणे तसेच शेतक-यांमध्ये पाणी वापराबाबतच्या नियोजनाची जनजागृती करुन धोरण ठरवावे लागेल, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे माजी सचिव डॉ.दि.मा.मोरे यांनी केले.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम), भारतीय जलसंस्कृती मंडळ, औरंगाबाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कृषी विभाग, उस्मानाबाद आणि श्रीदत्त साई मंदीर ट्रस्ट, वाठवडा (ता. कळंब) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलसाक्षरता कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहूणे म्हणून भारतीय जलसंस्कृती मंडळ, औरंगाबादचे अध्यक्ष डॉ.दत्ता देशकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, मुंबई दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागाचे (केस्कॉम) अध्यक्षअण्णासाहेब टेकाळे, विरगुळा केंद्र व वृध्दाश्राम समितीचे डॉ.बी.आर.पाटील, सहकार महर्षि शिवाजीराव नाडे, वाठवडयाचे सरपंच विद्या जनक पुंड, तालुका कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.मोरे म्हणाले की, या जिल्ह्याचा भाग हा अवर्षण पट्टयात मोडत आहे. अशा परिस्थितीत तलाव व धरणातील पाणी बाप्पीभवनाने कमी होत आहे. अशा काळात पाणी साठविणे पहिले कर्तव्य असून साठविलेल्या पाण्याचे विचारपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे. शेती सारखा व्यवसाय करतांना जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी पाणी साठविणे नितांत गरजेचे आहे. शेती, उद्योग आणि सेवाक्षेत्र या तिन्ही अंगाना एकत्र आणण्याचे धोरण ठेवले तरच ग्रामीण भागाचा विकास होईल. सध्याच्या अनुकूल परिस्थितीत ऊस पिकाला मुबलक पाणी देण्याचे दिवस राहिले नाहीत. पाणी ही संपत्ती समजून माहिती तंत्रज्ञानातील प्रक्रिया करणारे उद्योग, कारखाने ग्रामीण भागात येण्याची गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे म्हणाले की, पाण्याचा पुर्नवावर केल्यास टंचाईवर मात करता येते. भूगर्भातील अति पाणी उपसा व वापर केल्यामुळेच पाणी पातळी खाली गेली आहे. ऊस पिकावरील उत्पादन व त्यावर होणारा पाण्याचा वापर याचे धोरण बदलण्याची गरज व्यक्त केली.
छतावरील पाणी साठवून ते पिण्यासाठी वापरल्यास कसल्याच प्रकारचे आजार होत नाहीत. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी बाष्पीरोधक यंत्रणा आपण जिल्ह्यात राबविली असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. देशकर यांनी पाण्याचे संग्रहण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे गावातील सर्व शेतक-यांनी जल व्यवस्थापन करावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी सांगितले की, केंद व राज्य शासनाच्या 136 योजना आहेत. मागेल त्याला या योजनेचा लाभ मिळून शेतकऱ्यांना पुढे येता येते. रब्बी व खरीपाच्या पिकाचे योग्य नियोजन केले तर आर्थिक प्रगती साधता येते. पाणी टंचाईची परिस्थिती का व कशी आली याचे चिंतन करुन भविष्यात पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी गणित मांडणे गरजेचे आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणलोट विकास समितीच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे, विहिरींचे पुनर्भरण, महात्मा फुले जलभूमी संधारण योजनेतून गाळ काढण्याचे नियोजन करावे,असे त्यांनी आवाहन केले.
या कार्यशाळेस वाठवडा व परिसरातील शेतकरी, कृषी विभागातील अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आदि मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत टेकाळे आणि अविनाश पवार यांनी, प्रास्ताविक अण्णासाहेब टेकाळे यांनी केले तर तालुका कृषी अधिकारी शेरखाने यांनी आभार मानले.