उस्मानाबाद -: जिल्ह्यातील आठही नगरपरिषदांनी शहरी भागासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी दिले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नुकतीच जिल्हा कृती आराखडा अद्यावत करण्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलुरे, विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
प्रत्येक विभागाने आपल्या विभागाचे फायर ऑडिट करुन घ्यावे, जिल्ह्यातंर्गत महामार्गावरुन होणा-या वाहतुकीमध्ये रासायनिक पदार्थ वाहतूक करणारे टॅंकर आहेत. त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या टॅंकरची वाहतूक केली जाते याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिका-यांनी माहिती अकत्रित करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास डॉ. नागरगोजे यांनी सांगितले. रासायनिक पदार्थांची गळती झाल्यास त्यासाठी कोणत्या प्रकारचे औषधोपचार आवश्यक आहेत याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
याशिवाय रस्ता सुरक्षा समितीची बैठक घ्यावी, अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देताना सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींचाही सहभाग वाढवावा, जनजागृतीच्या साह्याने अधिकाधिक लोकांपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाचे काम पोहोचवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.