रघुनाथ शिंदे
उस्मानाबाद :- मुंबई येथील रघुनाथ रामचंद्र शिंदे हे 65 वर्ष वयाचे गृहस्थ 7 मे रोजी तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथून बेपत्ता झाल्याची तक्रार रवि रघुनाथ शिंदे (रा.मुंबई) यांनी पोलीस ठाणे तुळजापूर येथे केली आहे.
       रघुनाथ शिंदे यांची उंची 5 फुट 6 इंच असून रंग सावळा आहे. अंगकाठी सडपातळ असून चेहरा उभट आहे आणि अंगात पांढ-या रंगाचा पायजमा आणि चौकटी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. सदर वर्णनाची व्यक्ती कोणास आढळून आल्यास त्यांनी पोलीस ठाणे, तुळजापूर (02471-242028) अथवा पो.कॉ. जाधवर (9423765852), रवी शिंदे (09004669106), संतोष शिंदे (9673477214) येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top