उस्मानाबाद :- शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत सहाय्य आयुक्त, समाज कल्याण विभाग, उस्मानाबादच्या अधिनस्त असलेल्या जिल्हयातील अनुसूचित जाती (मुलींची) शासकीय निवासी शाळा दर्गारोड, उस्मानाबाद, अनुसूचित जाती (मुलांची) शासकीय निवासी शाळा मुरुम, ता. उमरगा आणि अनुसूचित जाती (मुलांची) शासकीय निवासी शाळा, गोलेगाव, ता.भूम येथे इयत्ता 5 वी ते 9 वी या प्रत्येक वर्गात किमान 40 विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी रितसर अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांनी केले आहे.
शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांची निवड ही जातीच्या निकषानुसार व गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येते. पालकाचे वार्षीक उत्पन्न अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रुपये 2 लाख तर इतर प्रवर्गासाठी 1 लाख इतके आहे. निवासी शाळेत विनामुल्य जेवणाची व राहण्याची सुविधा उपलब्ध असून शालेय शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीत प्रवेश अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.