उस्मानाबाद :- सन 2013-14 या शैक्षणिक वर्षापासून वसतीगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असून अधिक माहिती http://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे परंडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहाच्या गृहपालांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या , व्यावसायीक महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत असलेल्या अनुसूचित जमातीतील ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखाच्या आत आहे आणि विमुक्त भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे असे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतीगृहात जेवण व निवासाची व्यवस्था विनामुल्य केली जाते.
यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, इ.7 वी पास, इ.10 वी पास, 12 वी पास या विद्यार्थ्यांनाच वसतिगृह प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज करता येईल, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रतिमहा 500 रुपये निर्वाह भत्ता व शैक्षणिक साहित्य, 10 वी व आय. टी. आय.च्या विद्यार्थ्यांना 16 मे 1984 च्या शासन निर्णयानूसार सुविधा दिल्या जातात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्रतिवर्षी रु. 4 हजार दिले जातात. गणवेशासाठी रुपये 2 हजार प्रति विद्यार्थ्यांना दिले जातात.