उस्मानाबाद :- जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक सोमवार,दि. 20 मे रोजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणार असल्याचे जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
    जिल्हा वार्षीक योजना सन 2012-13 अंतर्गत सर्वसाधारण,अनुसूचित जाती उपयोजना आणि ओटीएसपी यांचा मार्च 2013 पर्यंतच्या खर्चाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. या बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य, सर्वसंबधित जिल्हास्तरीय अधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top