उस्मानाबाद :- शहरात 14 मे पासुन सुरु असणा-या धान्य महोत्सवास पहिल्याच वर्षी उस्मानाबादकरांनी चांगला प्रतिसाद दिला. विशेषत: ज्वारी, गहू, तांदुळ आणि आंबे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. आज या महोत्सवाचा समारोप झाला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात प्रसिध्द असणा-या त्या त्या भागातील धान्य, डाळी, कडधान्य आणि फळपीकांची एकाच ठिकाणी विक्री हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.
येथील परिमल मंगल कार्यालयात हा धान्य महोत्सव झाला. ग्राहक आणि उत्पादक यातील दलालांची साखळी कमी होवून ग्राहकांना शेतातील माल थेट त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावा हा हेतू या महोत्सवाच्या माध्यमातून यशस्वी झाल्याचे चित्र गेल्या तीन दिवसात दिसले. या महोत्सवाच्या ठिकाणी 22स्टॉल्स लावण्यात आले होते. यात कडधान्य विक्री, ज्वारी,डाळींब, गहू, तांदुळ यासह कृषीपुरक उत्पादने तसेच कृषी औजारे आदींचेही स्टॉल्स लावण्यात आले होते. विशेषत: केशर आंबा आणि तांदुळ विक्रीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. याशिवाय परंडा आणि भूम भागातील नैसर्गिक ज्वारी खरेदीसाठीही ग्राहकांनी गर्दी केली होती.
पुढील वर्षीही खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात त्या त्या हंगामातील उत्पादीत माल विक्रीसाठी धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशा भावना यावेळी ग्राहकांनी व्यक्त केल्या.
धान्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,उपविभागीय कृषी अधिकारी, आठही तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांच्यासह आत्माचे अधिकारी यांनी परिश्रम घेतले.