बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: खांडवी (ता. बार्शी) येथील बारंगुळे वस्‍ती येथील येडेश्‍वरी मंदिरातील नव्‍याने बांधलेल्‍या सभामंडप व कलशाचे पूजन आज गुरुवार दि. 16 मे रोजी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
    यावेळी बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अरुण बारबोले, जिल्‍हा परिषदेचे विरोधी पक्षनेते संजय पाटील, माजी पं.स. सदस्‍य सर्जेराव कुदळे, पं.स. सदस्‍य बाळासाहेब खराडे, मंदिराच्‍या नूतन सभामंडपाची निर्मिती करणारे महादेव चोरघडे, सरपंच सुरेश शेंडगे, उपसरपंच धनाजी बरडे, विठ्ठल आवारे, काका मुकटे, चेतन कोठारी, आर.डी. देशमुख, भारत भाकरे, पांडुरंग माळी, भिमा शिरामे, अरुण वायकुळे, बिभिषण माळी, रामचंद्र शिणगारे, सुरेश बारंगुळे, सुधीर बारंगुळे, विश्‍वनाथ काळे, श्रीराम बारंगुळे, रामेश्‍वर भाकरे, भिमराव, पवन गव्‍हाणे, संतोष पाटील, बंडू धुमाळ, सचिन दळवी, उत्‍तम निकम, जनार्धन चोरघडे यांच्‍यासह ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
    या मंदिराच्‍या शिखराचे बांधकाम खांडवीतील दादा दळवी यांनी केले असून चंद्रकांत उध्‍दव चोरघडे यांच्‍या हस्‍ते कलशारोहण समारंभ पूर्ण करण्‍यात आले. मंदिरातील पौरोहित्‍याचे काम कल्‍याण कुलकर्णी यांनी केले.
 
Top