बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील युनायटेड इंडिया इन्श्योरंस कंपनीच्या कार्यालयातील तिजोरीत असलेल्या 1 लाख 44 हजार रुपयांची रक्कम अचानक गायब झाल्याने चोरी झाली, दरोडा पडला की जादू झाली, असा प्रश्न तेथील अधिका-यांना पडला आहे. सदरच्याघटनेची फिर्याद कर्मचारी जयंत काशिनाथ भागवत यानी बार्शी पोलिसात दिली आहे.
दि. 17 मे रोजी रात्री आठ पासून दि. 18 मे च्या सकाळी अकराच्या दरम्यान सदरचा प्रकार घडला असून घटनेतील बाहेरचा दरवाजा, कुलूप, कडी कोयंडे, आतील दरवाजा कुलूप, तिजोरीचे कुलूप इत्यादी सुस्थितीत असून सदरच्या प्रकारात बनावट चावीचा वापर केल्याचे दिसून येते. घटना घडून दोन दिवस उलटल्यावर बार्शी पोलिसात अधिका-यांनी फिर्याद मार्गाने तपास करुन गुन्हेगार बाहेरचा आहे का याचा शोध घेता आला असता. सदरच्या संशयास्पद कृतीमुळे यातील गुन्हा करणारा व्यक्ती हा कार्यालयातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरच्या कार्यालयाच्या तीन चाव्या असून अधिका-याकड एक चावी व दोन सेवकांकडे असते. यातील नेमक्या कोणत्या चावीने कुलूप उघडले याचा उलगडा झाला नाही. सदरच्या तिजोरीत आणखी किरकोळ रक्कम होती. परंतु याला चोरट्याने अजिबात हात लावला नाही, यावरुन त्याचा उद्देश वेगळा असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदरच्या प्रकारावरुन 454, 457, 380 नुसार बार्शी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौ. पडवळ या करीत आहेत.