अथर्व मुंढे
कळंब -: पूर्व माध्‍यमिक शाळा शिष्‍यवृत्‍ती परीक्षा-2013 चा अंतिम निकाल नुकताच जाहिर झाला. त्‍यामध्‍ये उपळाई (ता. कळंब) येथील चि. अथर्व किसन मुंढे हा राज्‍यस्‍तरीय गुणवत्‍ता यादीत नवव्‍या मेरिट क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहे. त्‍याला 300 पैकी 282 गुण मिळाले आहेत. अ‍थर्व मुंढे हा शिशु संस्‍कार केंद्र प्राथमिक विद्यामंदीर, बार्शी (जि. सोलापूर) या शाळेचा विद्यार्थी आहे. त्‍याच्‍या या यशाबद्दल शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती कदम यांनी पुष्‍पगुच्‍छ देवून अभिनंदन केले. तर वर्गशिक्षिका श्रीमती ठोंबरे, शिंदे, खाडे व त्‍याचे पालक सौ. निर्मला मुंढे, किसन मुंढे यांचे त्‍यास मार्गदर्शन लाभले. त्‍याच्‍या या यशाबद्दल बार्शी व उपळाई परिसरातून त्‍याचे कौतुक होत आहे. दरम्‍यान, पालक किसन मुंढे यांची नुकतीच महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेद्वारे विक्रीकर निरीक्षक या पदासाठी निवड झाली आहे.
 
Top