बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील दि. विश्वेश्वर सहकारी बँक लि. पुणे शाखा बार्शीच्यावतीने वीरशैव रूद्रभूमी (स्मशानभूमी) करीता पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्यासाठी एक हजार लिटरच्या दोन टाक्या व स्वामी विवेकानंद विद्यालय गोरमाळे यांना दोन टाक्या देण्यात आल्या.
यावेळी बँकेचे चेअरमन सुनिल रुकारी, संचालक शरद हापसे, बापूसाहेब धनकवडे, गोविंद कामटे, शिवाजी साखरे, नंदकुमार होनराव, बार्शी शाखेचे शाखा व्यवस्थापक अनिल खजानदार, शंकर चौगुले, धनंजय धारुरकर, प्रभुलिंग स्वामी, विवेक वायकर, सोमेश्वर घाणेगावकर, अरुण बेणे आदीजण उपस्थित होते.
यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन सुनिल रुकारी म्हणाले की, यापूर्वी बँकेने अनेक सामाजिक कार्यात मदत केली असून दुष्काळी परिस्थितीमुळे सांगली, सातारा आदी भागात पाण्याच्या साठवणुकीसाठी 125 टाक्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. या कामी कोणताही ठराविक समाज न पाहता ज्यांना आवश्यकता आहे, त्यांना मदत केली असून सामाजिक कार्यासाठी एक सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम केले आहे. लाभार्थी हा बँकेचा सभासद आहे अथवा नाही हा निकष न ठेवता ज्यांना गरज आहे, त्यांना मदत केली आहे. भगवंताचे आशिर्वाद असल्यामुळेच आमच्याकडून चांगले कार्य घडत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.