पंढरपूर -: वादग्रस्त निर्णय घ्यायचे, वाद निर्माण करायचा आणि पुन्हा माघार घ्यायची, असा गेल्या अनेक वर्षापासूनचा शिरस्ता मंदीर समितीने कायम पाळला असून वारक-यांच तीव्र नाराजीपुढे झुकून मंदीर समितीने महापूजा, अभिषेकासाठी उत्सवमूर्ती बसविण्याचा दि. 26 एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयास स्थगिती दिली आहे. तशा प्रकारचा निर्णय समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
श्री विठ्ठलाची 'स्वयंभू' मूर्ती कुमकुवत झाली असून तिच्यावरील पंचामृतादी स्वरुपाचे महाभिषेक, महापूजा करण्यात येऊ नयेत, अशा सूचना भारतीय पुरातत्व विभागाने दिल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून श्री विठ्ठलाची महापूजा, अभिषेक बंद करण्यात आले आहेत. मात्र यामुळे मंदीर समितीमधील काही पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह सेवाधिका-यांचेही आर्थिक नुकसान होऊ लागले असल्याची चर्चा सुरु होती.
पंचधातूची श्री विठ्ठल मूर्ती तयार करुन तिच्यावर महाभिषेक करुन महापूजा करण्याचा निण्रय मंदीर समितीने दि. 5 जानेवारी 2010 च्या बैठकीत घेतला. त्यानुसार पंचधातूची मुर्ती तयार करुन घेतली, मात्र ती विठ्ठलाच्या मूळ मूर्तीसारखी दिसत नाही वगैरे सबबींवर महाभिषेक पूजा चालू करण्यास विरोध झाला. दि. 16 नोव्हेंबर 2012 च्या मंदीर समितीच्या कार्यक्रम पत्रिकेवर महाभिषेक पूजा सुरु करण्याचा विषय आला. तेंव्हा एकमताने मंदीरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीप्रमाणे दगडी मूतभ््र योग्य त्या ठिकाणी बसवावी व महाभिषेक व महापूजा पुन्हा चालू करावी, असे ठरले होते. दि. 26 एप्रिल 2013 रोजीच्या बैठकीत समितीने दत्तासिंह परदेशी यांनी तयार केलेली मूर्ती बसवायची व महाभिषेक पूजा सुरु करण्याचा निर्णय एकमताने घेतला व तो जाहीर केला. मात्र यानंतर वारकरी संप्रदायातून या निर्णयाला तीव्र विरोध झाला. प्रसंगी मंदीर समितीला कोर्टात खेचण्याचेही इशारे दिले गेले. त्यानंतर मंदीर समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब डांगे यांनी प्रसिध्दीपत्रक काढून चूक दुरुस्त करुन घेण्याची ग्वाही गेल्या आठवड्यात दिली. त्यानंतर रविवारी मंदीर समितीने तातडीची बैठक घेऊन उत्सवमूर्ती बसवून महाभिशेक सुरु करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली. तशा प्रकारचे पत्रक मंदीर समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब डांगे यांनी प्रसिध्दीसाठी दिले आहे. या प्रकरणामुळे मंदीर समितीने गरज नसताना वाद निर्माण करुन घेतला आणि पुन्हा माघार घेऊन या वादावर पडदाही टाकला आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक वादग्रस्त निर्णय मंदीर समितीने घेतले असून त्या निर्णयापासून नंतर घूमजाव करण्याचीही वेळ समिती व्यवस्थापनावर आलेली होती.