नवी दिल्ली -: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दहा दिवसात रोमिंग फ्रीबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रव्यापी मुक्त रोमिंगवर विचारविनिमय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा ते पंधरा दिवसात त्याबाबत शिफारशी लागू होणार आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याची माहिती 'ट्राय'चे अध्यक्ष राहुल खुल्लर यांनी दिली.
खुल्लर म्हणाले की, देशभर फ्री रोमिंग सुविधा देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. फ्री रोमिंगबाबत विचारविनियम सुरु आहे. 'ट्राय' ने आपल्या शिफारशी दिल्यानंतर फ्री रोमिंगचा विचार केला जाईल. फ्री रोमिंगसाठी काही नियम तयार करण्यात आले आहे. त्याची प्रक्रिया पुर्णत्वाकडे गेली आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. फ्री रोमिंगमुळे टेलिफोन ऑपरेटर करणा-या कंपन्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. मात्र, फ्री रोमिंगचा लाभ ग्राहकांना होणार आहे. टेलिफोन ऑपरेटर कंपन्यांना 12.5 ते 15 हजार कोटींचा तोटा सहन करावा लागेल.
अधिभारातून ग्राहकांची सुटका
खासगी टेलिफोन कंपन्या आपल्या सर्कलमधून दुस-या सर्कलमध्ये जाताना काही चार्ज लावायच्या. त्यामुळे एक कंपनी दुस-या कंपनीची सेवा घेतल्याने अधिकचा चार्ज घ्यायच्या. आता ट्रायने रोमिंग फ्री केल्यानंतर हे शुल्क कोणालाच द्यावे लागणार नाही. त्यामुळे नफा कमवणा-या कंपन्यांचा चाप बसणार नाही.