प्रा. रामदास ढोकळे
नळदुर्ग -: येथील बालाघाट शिक्षण संस्‍थेच्‍या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. रामदास ढोकळे यांच्या संशोधन भित्तीपत्रिकेचा रसायनशास्त्रातील मॅक्रो 2013 या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट भित्तीपत्रिका म्हणून गौरव करण्यात आला. बेंगलोर येथे भारतीय विज्ञान संस्था व तिसरी फेडरेशन ऑफ एशियन पॉलिमर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 18 मे दरम्यान बेंगलोर येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारतासह जगभरातील 500 संशोधकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये प्रा. ढोकळे यांनी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र यांच्यावतीने या परिषदेत सहभाग नोंदविला होता. या यशाबद्दल प्रा. ढोकळे यांचे उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव नरेंद्र बोरगावकर, कार्याध्यक्ष सिद्रामअप्पा आलुरे, संभाजी पाटील बाभळगावकर, कुलसचिव डॉ.धनंजय माने, उपकेंद्राचे संचालक डॉ. अशोक मोहेकर, मार्गदर्शक डॉ. सागर डोळेकर, प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, एस. रामकृष्णन आदींनी कौतुक केले आहे.
 
Top