मुंबई -: स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेला विंदू दारासिंग आणि गुरुनाथ मयप्पन यांच्यात फिक्सिंगसाठी कोडवर्डमध्ये संभाषण चालत असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. तसेच गुरुनाथ आपला नोकर कमलनाथ याच्या नावाने घेतलेल्या सीमकार्डद्वारे फोन करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
    या सीमकार्डचा वापर तो बुकी आणि विंदू यांच्याशी बोलण्यासाठी करायचा असा दावा पोलिसांनी केला आहे. याबाबतची व सांकेतिक भाषेतील अर्थ समजून घेऊन अधिक चौकशी करण्यासाठी विंदू आणि गुरुनाथ यांची पोलिस कोठडी वाढवावी, अशी विनंती पोलिसांनी कोर्टाला केली होती. ती कोर्टाने मान्य करीत मयप्पन व विंदूची 31 मेपर्यंत कोठडीत वाढ केली आहे.
    विंदू दारासिंगला सटटे्बाज जगात ‘जॅक’ तर गुरुनाथ मयप्पनला ‘गुरुजी’ नावाने ओळखले जात असे. हे दोघेही बुकींशी याच नावाने बोलत. बुकींच्या कोडवर्डमध्ये सट्ट्याला ‘कराची’, एक कोटीला खोकाऐवजी 'मिरची' असे बोलले जात असत.

सट्टेबाजांचे 'कोड वर्ड्स'

सचिन तेंडुलकर - बटकू
महेंद्रसिंग धोनी - हेलिकॉप्टर
ख्रिस गेल - रावण
लसिथ मलिंगा - मंकी
युवराज सिंग - मॉडेल
वीरेंद्र सेहवाग - चष्मा
हरभजन सिंग - पगडी
सुरेश रैना - शेर
श्रीशांत - रोतलू
अजित चंडिला - मोगली
अंकित चव्हाण - कावळा
विराट कोहली - शायनिंग
आर. अश्‍विन - फिरकी
 
Top