उस्मानाबाद :- दरवर्षी दि. 21 मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त मंगळवार दि. 21 मे रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच विविध शासकीय कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाच्या निमित्त प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. याशिवाय विविध स्तरावर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे.
विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक व सांस्कृतिक संस्था यांनीही यादिवशी दहशतवादआणि हिंसाचाराविरुध्द जनजागृती करण्यासाठी व्याख्याने, भाषणे, चर्चा, परिसंवाद, चर्चासत्र तसेच सांस्कृतिक समारंभ यांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.