आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा नुकताच दि. 17 मे रोजी स्मृतीदिन झाला. वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी 17 मे 1846 रोजी बाळशास्त्रींचे निधन झाले. बाळशास्त्रींनी 6 जानेवारी 1932 रोजी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले तेव्हा त्यांचे वय अवघे 20 वर्षांचे होते.बाळशास्त्री केवळ पत्रकारच नव्हते तर ते पकांड पंडित होते. विविध विषयांवर त्यांनी 13 ग्रंथ लिहून प्रकाशित केले. ते भाषा प्रभू होते. मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी या भाषांखेरीज ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, इंग्रजी, गुजराथा, फ्रेच, बंगाली अशा देशी-विदेशी भाषा त्यांना अवगत होत्या.
     अशा विद्ववानाचे निधन वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी झाले. बाळशास्त्रीची शरीरयष्ठी फारशी दणकट नसली तरी त्यांच्या विद्वत्ततेचे तेज त्याच्या चेह-यावर तळपत होते. तारूण्य आणि तेजःपूंज चेहरा,डोक्यावरील पगडी यामुळे ते चार-चोघात उठून दिसत. मात्र सरकार त्यांचे म्हणून जे छायाचित्र 6 जानेवारी किंवा 17 मे रोजी आपल्या जाहिरातीत प्रसिध्द करीत असते ते 33 वर्षांच्या तरूणाचे वाटत नाही. ते 65 वर्षाच्या थकलेल्या,विविध व्याधिंनी गांजलेल्या वृध्दाचे वाटते.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने बाळशास्त्री जांभेकरांचे हे चुकीचे  छायाचित्र आपल्या जाहिरातीत वापरणे त्वरित बंद करावे अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे.
      मराठी पत्रकार परिषदेने 2002 मध्ये बाळशास्त्रींचे एक छायाचित्र प्रसिध्द केले होते.मुकुंद बहुलेकर या छायाचित्रकाराने काढलेल्या या छायाचित्राचे प्रकाशन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात बालगंधर्वमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले होते.हे छायाचित्र पाहून बाळासाहेब खूष झाले होते. हेच खऱे बाळशास्त्री आहेत असे उद्दगार तेव्हा त्यांनी काढले होते. छायाचित्रकार बहुलेकर यांना बोलावून त्यांनी त्यांना शाबासकीही दिली होती.बाळासाहेबांसारख्या ज्येष्ठ पत्रकार आणि व्यंगचित्रकाराने मान्यता दिल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेने हे छायाचित्र  क ॅलेंडर स्वरूपात प्रसिध्द करून ते महाराष्ट्रभर वितरीत केले होते.त्यामुळे महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पत्रकार मुकुंद बहुलेकरांनीच काढलेले छायाचित्र वापरले जाते. परंतू सरकार दरबारी मात्र कोणताही विचार न करता जुनेच आणि अत्यंत चुकीचे छायाचित्र जाहिरातीत किंवा अन्य ठिकाणी वापरले जाते.चुकीचे चित्र वापरून मराठी पत्रकारंामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम सरकारच्या माहिती आणि जंनसंपर्क विभागाने तातडीने बंद करावे अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे.
महाराष्ट्रातील तमाम पत्रकार आणि पत्रकार संघटनांना विनंती आहे की,आपल्या कार्यक्रमाच्या वेळेस बाळशास्त्री जांभेकर यांचे मुकुंद बहुलेकर यांना काढलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गौरविलेलेच छायाचित्र वापरावे.मराठी पत्रकार परिषदेने कॅलेंडर स्वरूपात छायाचित्र छापून त्याचा पुरवठा करावा अशीही परिषदेच्या पदाधिका-यांना विनंती आहे.
(वरती दोन्ही छायाचित्रं दिली आहेत. या छायाचित्रातील फरक सुज्ञ पत्रकार आणि वाचकांच्याही लक्षात येईल.)
* सौजन्‍य : उद्याचा बातमीदार
 
Top