उस्मानाबाद -: अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन काम केल्यामुळे येथील नायब तहसीलदार पी. एम. सोनटक्के यांना जिल्हाधिकार्यांनी निलंबित केले आहे. तहसीलदारांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर अप्पर जिल्हाधिकार्यांनी अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी ही कारवाई केली आहे.
उस्मानाबादच्या तहसीलदारांनी याबाबत दि. 13 मार्च 2013 रोजी अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार नायब तहसीलदार पी. एम. सोनटक्के यांनी त्यांना अधिकार नसताना अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन तहसीलदारांचे अधिकार वापरले, ही बाब शिस्तीचा भंग करणारी असून, सोनटक्के यांच्याविरुध्द कारवाई करण्यात यावी, असा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार चौकशी करून अहलवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी अप्पर जिल्हाधिकार्यांना दिले होते. या प्रकरणात अप्पर जिल्हाधिकार्यांनी उपविभागीय अधिकार्यांमार्फत चौकशी केली. उपविभागीय अधिकार्यांनी दि. 28 मार्च रोजी अप्पर जिल्हाधिकार्यांकडे अहवाल सादर केला होता. या अहवालावरून जिल्हाधिकार्यांनी नायब तहसीलदार सोनटक्के यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना भूम येथील तहसील कार्यालयात थांबावे लागणार आहे. भूम तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीशिवाय सोनटक्के यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी दिले आहेत.

(साभार - दिव्यमराठी)