उमरगा -: घोटभर पाण्याच्या शोधात वणवण भटकणा-या व तहानेने व्याकूळ झालेल्या काळवीट व हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना एकुरगा (ता. उमरगा) पाटीनजीक घडली. मरण पावलेल्या काळवीट व हरिणावर मंगळवारी एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उमरगा तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून वन्य प्राण्यांना शिवारात पाण्याची उपलब्धता नसल्याने मिळेल त्या ठिकाणी वन्य प्राणी भटकंती करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. माडज, एकुरगा, जकेकुर, बिरुदेव मंदिर परिसरात ७ ते ८ हरणांच्या टोळ्या गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. लातूर, उमरगा रस्त्यानजीक एकुरगा पाटीच्या पूर्वेस असलेल्या आश्रम शाळेच्या पाठीमागे काही शेतकर्यांच्या विहिरी आहेत. याच शिवारात माडज येथील विरभद्र कुंभार यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील विहिरीत अल्पसे पाणी असून, आपली तहान भागविण्यासाठी भटकंती करणार्या त्या हरणांना विहिरीतील पाणी दिसले. तहानेने व्याकुळ झालेली दोन्ही हरणे आपली तहान भागविण्यासाठी विहिरीत उतरण्याच्या प्रयत्नात पाय घसरुन पडली. विहीर खोल तसेच त्यातून पाणीउपसा बंद असल्याने त्यामध्ये हरीण पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. सदर हरणांचा मृत्यू गेल्या दोन दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचार्यांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती माडज येथील पोलिस पाटील मारुती रेवणाप्पा कुंभार यांनी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयास कळविली. वनरक्षक डी.एस. राठोड, बी.एल. शेळके, वनपाल बी.एच. राठोड, आर.बी. मुजावर यांनी मंगळवारी सकाळी विहिरीतील हरणांचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी बारुळे यांनी शवविच्छेदन केले. वनरक्षक घुगे यांनी भडाग्नी दिला. एकाच चित्तेवर हरिण आणि काळवीट या दोघांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतकरी, शेतमालक, वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. घोटभर पाण्यासाठी प्राणास मुकाव्या लागलेल्या या वन्य प्राण्याबद्दल तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान एकुरगा पाटीनजीक वन्य प्राण्यांसाठी पाणवठे बांधण्याची मागणी होत आहे.