लातूर :- महाराष्ट्र शासनाच्या अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत अस्थिव्यंग असलेल्या 6 ते 14 वर्ष वयोगटातील अपंग बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रीम अवयव पुरवण्याच्या सुविधा पुरविणारी शासकीय निवासी संस्था, मिरज येथे 2013-14 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
     या संस्थेत पहिली ते चौथी आणि 5 वी पासून माध्यमिक शाळेपर्यंत मोफत शिक्षण तसेच माध्यमिक शाळेत जाणे व येण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा. पाठ्यपुस्तके वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत, वसतिगृहात अपंग मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवास, जेवण, पाणी, प्रत्येक विद्यार्थ्यास कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्याचा मोफत पुरवठा, अस्थिव्यंगोपचार तज्ञांच्या सल्यानुसार शस्त्रक्रिया व उपचार, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकल वाटप इ. सुविधा आहेत.
     प्रवेश अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेला अपंगत्व दाखला, उत्पन्नाचा दाखला, टीसी, अपंगत्व दिसेल असे 3 फोटो व 3 आयडेंटीटी कार्ड साईज फोटो जोडणे आवश्यक आहे.
      प्रवेश अर्ज माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय अपंग बालक गृह व शाळा मिरज, किल्लाभाग, प्रांत कार्यालयाच्या पाठीमागे, मिरज, ता. मिरज, जि. सांगली पीन कोड- 416410 येथे समक्ष/पोस्टाव्दारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी 0233-2222513, 9325555981/ 9422481504 या दुरध्वनी अथवा मोबाईलवर संपर्क साधावा.
 
Top