उस्मानाबाद - हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांच्या ऊर्सनिमित्त जिल्हा प्रशासनाने मंगळवार दि. 28 मे रोजी जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
     या स्थानिक सुट्टया सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालय आणि इतर शिक्षण संस्था यांना लागू राहील. जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयांना तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बॅंकांना लागू होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
 
Top