बार्शी -: श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात शिक्षण घेणारी कु. वर्षा राजेंद्र कर्पे (वय 18 वर्षे, रा. मांगडे चाळ, बार्शी) हिने घरातील लाकडी वाशाला नायलन दोरीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्‍या पूर्वी सदरचा प्रकार घडला असून नेमकी वेळ कोणाला माहीत आहे. इयत्‍ता बारावीच्‍या परीक्षेत नापास झाल्‍यानेच तिने अत्‍महत्‍या केली असावी, असा प्राथमिक अंदाज तिच्‍या नातेवाईकांनी व्‍यक्‍त केला. सदर घटनेचा पंचनामा करुन शवविच्‍छेदनासाठी ग्रामीण रूग्‍णालयात हलविण्‍यात आले.
 
Top