बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमित्‍त बार्शीत मध्‍यवर्ती जयंती उत्‍सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीचे औचित्‍य साधून शुक्रवार दि. 31 मे रोजी सकाळी हांडे गल्‍ली येथून मोटारसायकल रॅली काढण्‍यात येणार आहे. शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यावरुन ही रॅली महात्‍मा गांधी शॉपिंग सेंटरजवळ येणार आहे. यानंतर अहिल्‍यादेवींच्‍या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे. यावेळी डॉ. चंद्रकांत मोरे, मध्‍यवर्ती जयंती उत्‍सव मंडळाचे अध्‍यक्ष बापू होनराव, उपाध्‍यक्ष हंबीर नरुटे, बजरंग नरुटे, अमोल वायकुळे, सचिव दीपक खरात, सहसचिव संभाजी शेळके, सचिन शेंडगे, बिरु चोरमले, विशाल वायकुळे, मंडळाचे सल्‍लागार समीर वायकुळे, खंडू नरुटे, शितल पाटील, आप्‍पा शेंडगे, विश्‍वास शेंडगे, शितल पाटील यांच्‍यासह समाजातील विविध स्‍तरातील मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी अक्षय खरात यांच्‍यासह समाजबांधव परीश्रम घेत आहेत.
 
Top