उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहराची पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी आखण्यात आलेल्या उजनी ते उस्मानाबाद या महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेचे आज दि. 11 मे रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लोकार्पण करण्यात आले. या 114 किलोमीटर्स लांबीच्या पाणी पुरवठा योजनेच्या तेरणा जलशुद्धीकरण प्रकल्पातील कोनशिलेचे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अऩावरण करण्यात आले.
भिमा नदीवरील उजनी धरणापासून उस्मानबाद शहरापर्यंत आणण्यात आलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला केंद्र शासनाच्या युआडीएसएसएमटी योजनेतून अर्थसहाय्य करण्यात आले आहे.तसेच राज्य शासनानेही भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे.
उस्मानाबाद शहराच्या भविष्यातील लोकसंख्येला गृहीत धरून दरडोई दररोज चौसष्ठ लिटर पाणी पुरवता येईल़, असे या योजनेत नियोजन आहे. या कोनशिला अनावरण प्रसंगी उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार डाँ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, नगराध्यक्षा सौ. सरस्वती घोणे, प्रभारी नगराध्यक्ष अमित शिंदे, जिल्हाधिकारी डाँ. के. एम. नागरगोजे, मुख्याधिकारी अजय चारठाणकर आदी प्रमुख उपस्थित होते. या योजनेमुळे उस्मानाबाद शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची ठोस उपाययोजना झाल्याने, नागरिकांत मोठे समाधान आहे.