उस्मानाबाद जिल्ह्यात साखळी सिमेंट बंधारे उभारण्यासाठी 8 कोटी रुपयांचा निधी - मुख्यमंत्री चव्हाण यांची घोषणा
उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्यात साखळी सिमेंट बंधारे उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ सहाय्यता निधीतून 8 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आणि त्यावरील उपाय योजनांचा मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज एका बैठकीत आढावा घेतला. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ. विक्रम काळे, आ. राहूल मोटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, विश्वास शिंदे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी तसेच अतिरिक्त आयुक्त गोकुळ मवारे, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यातील टंचाई परिस्थितीवर विविध उपाय योजण्यासाठी शासनाने मोठी यंत्रणा कार्यान्वित केली असून आज घडीला राज्यात 11 हजारपेक्षा अधिक खेड्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे आणि सुमारे साडेआठ लाख गुरांच्या चारा पाण्याची सोय छावण्यांमधून करण्यात आली आहे असे सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यात लोकसहभागातून विविध सिंचन प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे, याबद्दल समाधान व्यक्त करुन त्यांनी हे काम पुढेही जोमाने सुरु ठेवावे असे सांगितले. ते म्हणाले की, गेल्यावर्षी राज्यातील विविध तालुक्यांना सिमेंट बंधारे उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. त्यातून सुमारे 1 हजार 400 बंधाऱ्यांची उभारणी झाली. यंदाही असा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला आणखी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे. या मागणीची पुर्तता करण्यासाठी 8 कोटी रुपये देण्यात येतील. जिल्ह्यात जेथे असे बंधारे उभा करणे शक्य आहे, त्याचा आराखडा तयार करावा. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला या कामासाठी आणखी निधी दिला जाईल.
मागील आढावा बैठकीच्यावेळी आपण उस्मानाबाद तसेच उमरगा शहराच्या पाणीपुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करुन दिला होता आणि आता या दोन्ही योजना पुर्ण झाल्या आहेत असे नमुद करुन मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबाद तसेच परंडा नळपाणीपुवठा योजनांसाठी अखंडीत वीज पुरवठा उपलब्ध राहावा म्हणून एक्सप्रेस फिडर उभारण्याच्या कामास त्वरीत मान्यता दिली जाईल, असे सांगितले. या कामासाठी अनुक्रमे 36 व 28 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
जिल्ह्यात येत्या जुन अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंत्रणेला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. प्रशासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून काम करावे. टंचाईग्रस्त भागातील जनतेच्या पाठीशी शासन उभे आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पाण्याचा नियोजनपुर्वक वापर होणे आणि उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना कार्यक्षमतेने काळजीपुर्वक चालविणे आवश्यक असून या कामांकडे यंत्रणेने लक्ष दयावे,असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली. सहकार विभागाने राष्ट्रीयकृत बँकांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध करुन दयावे. यासंदर्भात राज्य स्तरावर वेळोवेळी माहिती दिली जावी तसेच काही अडचणी असल्यास त्याचे निराकरण केले जावे, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टंचाई परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेने सकारात्मक दृष्टीकोनातून गतीने काम करावे, असे सांगितले.गुरांच्या छावण्यासाठी छावणी चालकांना पाणी उपलब्ध करुन दिले जावे,असे ते म्हणाले.
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देवून विविध उपाययोजना आणि पीक कर्जाबाबतची परिस्थिती विशद केली.
उपस्थित लोकप्रतिनिधिंनी जनावरांच्या छावण्या, पाणीपुरवठा, पीककर्जाचे वाटप, गाळ काढण्याची मोहिम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परिस्थिती, सिमेंट नालाबंधारे उभारणी, कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व देखभाल, गाव तलावांचे संवर्धन आदिबाबत त्यांचे म्हणणे मांडले.
जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून टंचाई परिस्थिती व त्यावरील उपायांची माहिती दिली. जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी 215 टँकर सुरु असून 1133 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गुरांच्या छावण्यामधून 23 हजारांवर जनावरांच्या चारा पाण्याची सोय करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेवर 18 हजार 100 मजूर काम करत आहेत. बाष्पीभवनरोधक उपायांमुळे बोरीसारख्या सिंचन प्रकल्पातील पाणी वाचवण्यात यश आले आहे. तीव्र उन्हाळ्यातही रोपवाटीकेतील 10 लाख रोपे वाचविण्यात आली आहेत. जिल्ह्यात विविध प्रकल्पातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला असून तेर येथे तेरणा नदीचे पात्र स्वच्छ व खोल केले जात आहे आदि तपशिल त्यांनी सांगितला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती देणारी पुस्तिका जिल्हा प्रशासनाने तयार केली असून या पुस्तिकेचे विमोचनही मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.