
* हास्यकलाकार परीन वाईज यांनी 1985 मध्ये सेंट कॅथरीन बंदरावरुन व्होडाफोनच्या कार्यालयात फोन करुन ब्रिटनमध्ये मोबाईल फोनच्या वापराची सुरुवात केली.
* फ्रान्सचे व्यावसायिक फिलीक खान यांनी 11 जून 1997 या दिवशी आपल्या नवजात मुलीचा सोफीचा फोटो काढून कॅमेरा असणाया फोनचा वापर सुरु केला.
* एरीजेना येथील एका प्रतिष्ठानने 2007 च्या सप्टेंबर महिन्यात कुत्र्यांसाठी मोबाईल फोन बाजारात आणला.
* 1993 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वायरलेस वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये आयबीएम सिमान नावाचा पहिला स्मार्ट फोन सादर केला गेला. यामध्ये सुरुवातीला टचस्क्रीन लावले होते. ई-मेल, इलेक्ट्रीक पेजर, कॅलेंडर, कॅलक्युलेटर आणि अँड्रेसबुकचा रुपात हा फोन काम करत असे.
* टेक्स्ट मेसेजसाठी 160 अक्षरांची सीमा फ्रिडेल हम हेलिब्रांड नावाच्या एका जर्मन अभियंत्याने सुरुवात केली. ही संकल्पना त्यांना आपल्या टाईपरायटवर काम करताना सुचले.
* ब्रिटनमध्ये पहिला एसएमएस नील पापवर्थ नावाच्या एका अभियंत्याने दि. 3 डिसेंबर 1992 मध्ये ऑरीबटल 901 हॅण्डसेटने आपले मित्र रिचर्ड जॉर्वीस याला पाठविला होता. त्याने लिहिलेले, "मेरी ख्रिसमस".
* आतापर्यंत सर्वात जास्त विक्री होणा-या हॅण्डसेटचा विक्रम नोकीया 1100 या फोनच्या नावावर आहे. 2003 मध्ये विक्रीसाठी आल्यानंतर 25 कोटीपेक्षा अधिक सेल विकले गेले होते.
* 2007 च्या जूनमध्ये अमेरिकेत आयफोन लाँच करण्यात आला. त्यावेळी प्रथम सेट मिळवण्यासाठी लोकांनी रात्रीपासूनच दुकानाच्या बाहेर रांग लावली होती. गुगलची सहायक कंपनी अँड्रॉईड इंकने 2007 मध्ये टचस्क्रिन मोबाईल फोन, स्मार्ट फोन आणि टॅबलेट कॉम्प्युटरसाठी अँड्राईड नावाची ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात सादर केली.