उस्मानाबाद -: कृषी व पणन विभाग यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी परिमल मंगल कार्यालय उस्मानाबाद येथे दि.14 ते 16 मे या कालावधीत धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील ताजा व स्वच्छ माल नागरिकांना या माध्यमातून उपलब्ध होणार असून या धान्य महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते या धान्य महोत्सवाचे उदघाटन मंगळवार दि. 14 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास खासदार डा. पद्मसिंह पाटील, एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राहूल मोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, आमदार दिलीपराव देशमुख, राणा जगजीतसिंह पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण, ओमराजे निंबाळकर, ज्ञानराज चौगुले, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, जि.प. कृषी सभापती पंडीत जोकार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या धान्य महोत्सवात ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, गळीत धान्य, विविध डाळी, फळे, भाजीपाला असा शेतीमाल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, कृषी प्रदर्शनामध्ये बियाणे, सूक्ष्ममूलद्रव्ये, ठिबक, तुषार, कृषी औजारे यांच्याबरोबरच कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी स्वतंत्र कक्ष मांडला जाणार आहे.
मध्यस्थ व दलाल यांची साखळी कमी होऊन आपल्या पसंतीनुसार शेतकऱ्यांना स्वच्छ व चांगल्या दर्जाचा शेतीमाल निवडण्याची संधी या धान्य महोत्सवाद्वारे उस्मानाबादकर ग्राहकांना मिळणार असल्याचे तोटावार यांनी सांगितले.