नळदुर्ग -: येथील नगरपालिकेच्यावतीने बांधण्यात येणा-या घरकुल योजनेत गैरप्रकार झाल्याने घरकुल योजना अद्यापही अर्धवट अवस्थेत असून न.पा. च्या घरकुल गैरप्रकाराची चौकशी होण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करुन नळदुर्गच्या लाभार्थ्यांना तातडीने घरे मिळवून द्यावीत, तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यास शासनास भाग पाडावे, असे निवेदन नळदुर्ग भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी नळदुर्ग येथे धावती भेट देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी नळदुर्ग शहरातील भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने घरकुल योजनेतील गैरप्रकाराबाबत निवेदन आ. फडणवीस यांना देण्यात आले. यावेळी निवेदन स्विकारल्यानंतर आ. फडणवीस यांनी नळदुर्ग येथील घरकुल घोटाळयाची चौकशी करुन ज्यांनी या योजनेत गैरप्रकार केला, त्यांच्यावर लवकरच फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे बोलताना सांगितले.
नळदुर्ग नगरपरिषदेंतर्गत सर्वसामान्यांना घरे मिळावित म्हणून केंद्र व राज्य शासनाने आयएचएसडीपी योजनेतून म्हाडाच्या माध्यमातून पाच वर्षापूर्वी बाराशे सहा घरांची घरकुल योजना दहा टक्के लाभार्थी हिस्स्यावर 80 हजार रुपये प्रति घरकुल यांप्रमाणे मंजूर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करुन पुढे म्हटले आहे की, या योजनांतर्गत पहिला धनादेश म्हणून 2 कोटी 39 लाखांचा निधी न.प. कडे वर्ग केला. मात्र न.प.ने निविदा काढताना 80 हजारांऐवजी 1 लाख 5 हजारांची निविदा काढून तत्कालीन नगरसेवकांच्या संगनमताने लातूर येथील मिनार कंन्स्ट्रक्शन या कंपनीस 16 कोटी 8 लाख 91 हजार 396 रुपयांचे टेंडर देवून सदरील काम 18 महिन्यात पूर्ण करण्याच्या अटीवर दिले. ही योजना राबविण्यासाठी शासनाने दाखविलेली योजना मंजूर करुन घेतली. आज केवळ जागा उपलब्ध नसल्यामुळे गेल्या पाच वर्षापासून ही योजना धूळखात पडली आहे. मिनार कंन्स्ट्रक्शन या कंपनीने सन 2008 पासून आजतागायत 1206 घरांपैकी केवळ 316 घरांचे बांधकाम पूर्ण केले असताना सदरील कंपनीस न.प.ने संगनमताने आतापर्यंत 9 लाख 50 हजार रुपये दिले आहेत. सदरील कंपनीने घरांचे बांधकाम पूर्ण करण्यास नकार दिला आहे. घरकुलचे बांधकाम दर्जाहीन झाले असून उस्मानाबाद जिल्हा हा भूकंपप्रवर्ण क्षेत्रात येत असताना हलक्या प्रतीचे घरे बांधून नगरपालिकेने बांधकाम होताना दुर्लक्ष केल्याचे बोलले जाते.
घरकुल बांधकामांसाठी शासनाने दिलेला निधी व लाभार्थ्यांकडून जमा केलेल्या दहा टक्के लोकवाट्याची रक्कम व त्यावरील बँकेने दिलेल्या व्याजाची रक्कम अन्य खात्यामध्ये वर्ग करुन त्याचा गैरवापर करण्यात आला आहे. लोकवाट्यापोटी लाभार्थ्यांनी जमा केलेल्या जवळपास 70 लाख रकमेचे व्याजही नगरपालिका गेल्या पाच वर्षापासून वापरत आहे. जे लोक योजनेतून माघार घेत आहेत. त्यांना त्यांची रक्कम व्याजासह देण्यात येत नाही. आजतागायत ही योजना पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नसल्याने अनेक लाभार्थी आजही घरकुलांच्या प्रतिक्षेत आहे. निवेदनावर भाजपाचे नळदुर्ग शहराध्यक्ष अभय नाईक, माजी उपनगराध्यक्ष दिलीप कुलकर्णी, सुशांत भूमकर, भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश कुलकर्णी, भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सौ. संध्या भूमकर आदींच्या स्वाक्ष-या आहेत. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, मनसेचे ज्योतीबा येडगे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.