बार्शी -: येथील सुभाषनगर परिसरातील तलावामध्ये बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे.
सतिश जालींदर माने (वय 42, रा. चोरमुले प्लॉट, बार्शी) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तलावाच्या पश्चिमेकडील भागातील पाण्याच्या काठावर त्याच्या प्रेताचा काही भाग वर दिसत असल्याचे दुपारी साडेतीनच्या दरम्यान पाहून एकाने बार्शी पोलिसांना खबर दिली. मयताची ओळख पटल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली. पंचनामा झाल्यानंतर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी प्रेत नेण्यात आले. बार्शी पोलिसात अकस्मात मयत नोंद झाली आहे. पुढील तपास पो.ना. भोंगाळे व फुलारी हे करीत आहेत.