उस्मानाबाद -: पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य अडचणींवरील उपाययोजना करण्याबाबत सर्व शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून-पूर्वतयारी बैठक फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संतोष राऊत, उपमुख्यकार्यकारी अधिकारी के.डी. बोणे यांच्यासह आठही तालुक्यांचे तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती.
फुलारी म्हणाले की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने सिंचन प्रकल्पांची आवश्यक तेथे दुरुस्ती करण्यात यावी. त्याठिकाणी पूर्णवेळ कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. विद्युत विभागानेही विद्युत खांबांची दुरुस्ती करावी. या काळात नियंत्रण कक्ष कार्यानिवत करावा, असे निर्देश दिले.
संबंधित तहसीलदारांनीही यासंदर्भात तालुकास्तरीय यंत्रणांची आपल्या स्तरावर बैठक घेऊन पावसाळ्यातील आपत्कालीन आराखड्याबाबत आणि त्याच्या अंमलबजावणाबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाने आपला आपत्कालिन आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पावसाळ्यात होणाऱ्या शेती, घर, शाळा आदींच्या संभाव्य नुकसानीबाबत संबंधित यंत्रणांनी जागरुक राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नगरपरिषद हद्दीत नाले तुंबण्याच्या घटना घडतात. नगरपालिकेने नालेसफाई, परिसर स्वच्छता, कचरा साफसफाई याचे नियोजन करुन तात्काळ मोहिम हाती घ्यावी, अशा सूचनाही फुलारी यांनी दिल्या.