उस्मानाबाद -: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डा. के.एम. नागरगोजे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, के. ए. तडवी, मिनाज मुल्ला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.