
शहरातील गायकवाउ कॉलनीत दि. 17 मे रोजी एक विवाह होता. या लग्नाला उमाकांत विश्वनाथ बनसोडे (वय 22, रा. फुलेनगर, उदगीर) हा आला होता. यावेळी महेंद्र कांबळे, रवी मुरतुळे, नितीन कांबळे, यांनी संगनमत करुन उमाकांत बनसोडे यास 'तुला पत्रिका अथवा निमंत्रण नसताना तू या लग्नास का आलास' म्हणून दगडाने व रॉडने मारुन जखमी केले, अशी फिर्याद उमाकांत बनसोडे यानी पोलीसात दिल्यावरुन वरील तिघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉं. सुर्यवंशी हे करीत आहेत.