मुंबई -: आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधी (दुष्काळ 2013) साठी एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली. या उद्योगसमुहाचे सल्लागार सुशील कुमार साबू यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी समुहाचे अधिकारी सुनील पै उपस्थित होते. या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आदित्य बिर्ला समुहाचे आभार मानले.
 
Top