नळदुर्ग -: श्री बसवेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त नंदगाव (ता. तुळजापूर) येथे दि. 5 ते 15 मे या कालावधीत पशुप्रदर्शन खरेदी-विक्री व उत्कृष्ट पशुपालक बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 7 मे ते 12 मे या कालावधीत पशुपालकासाठी तज्ञाचे मार्गदर्शन व सायंकाळी सहा वाजता दिपोत्सवाने पशु व कृषी तज्ञाचे मार्गदर्शन व शिवपारायण, सोमवार दि. 13 मे रोजी सकाळी सहा वाजता अभिषेक व त्यानंतर अग्नीप्रवेश व दुपारी बारा वाजता कलगीतुरा कार्यक्रम तर मंगळवार दि. 14 मे रोजी सकाळी 3 ते 9 तज्ञामार्फत उत्कृष्ट पशु, उत्कृष्ट शेतकरी व उत्कृष्ट विद्यार्थीचे निवड, सकाळी दहा वाजता कलगीतुरा कार्यक्रम, रात्री आठ वाजता संगीत कन्नड काटक, कै. कलावती चन्नविरप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश चन्नविरप्पा पाटील अंतिम कुस्तीसाठी ढाल बक्षीस, बुधवार दि. 15 मे रोजी सकाळी अकरा वाजता उत्कृष्ट पशुपालकांचा उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस वितरण समारोप संपन्न होणार आहे. तरी याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, उस्मानाबाद व बसवेश्वर यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.