उस्मानाबाद -: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 10 मे ते 10 जून या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात गाय व म्हैस यांना लाळखुरकूत रोगमुक्त करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. जनावरांचे बाजार, यात्रा, साखर कारखाना वाहतुकीच्या बैलगाड्या आणि चारा टंचाईमुळे उभारण्यात आलेल्या जनावरांच्या छावण्या याठिकाणी जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने लाळखुरकूत रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. आर. चंदेल यांनी केले आहे. लसीकरणासाठी प्रति जनावर केवळ एक रुपया इतके सेवाशुल्क आकारण्यातयेणार आहे.
   दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थाची निर्यात करुन ग्रामीण भागात चालणा-या या व्यवसायाला भरभराटी आणण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत. पशुजन्य पदार्थांची निर्यात होण्याच्या दृष्टीने ते घटक निर्जंतूक आणि रोगमुक्त जनावरांचे असणे महत्वाचे आहे. यासाठी अशा प्रकारचा रोग आटोक्यात आणणे व त्याचे उच्चाटन करणे गरजेचे आहे. एफएमडी-सीपी या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत 10 मे ते 10 जून या कालावधीत लसीकरण मोहीमेची चौथी फेरी बाबविण्यात येणार असल्याचे डॉ. चंदेल यांनी सांगितले.
        लाळखुरकूत हा द्विखुरी जनावरांना होणारा विषाणुजन्य सांसर्गिक आजार असून त्याचा फैलानव अत्यंत जलदगतीने धूळ, लाळ, बाधीत वारा, चारा, दूध व पाणी या माध्यमातून होतो. गुरांना ताप येऊन तोंडात, जिभेवर, खुरामध्ये, कासेवर फोड येणे यामुळे त्यांचे खाणेपिणे बंद होते. दुग्ध उत्पादन, ओढ कामाची कार्यशक्ती यावर विपरित परिणाम होतो. यामुळे राज्यात शंबर टक्के जनावरांना लसीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी प्रतिजनावर केवळ एक रुपया इतके सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे.
 
Top