मुंबई :-  सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास सभापती शिवाजीराव देशमुख, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपसभापती वसंत डावखरे, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली.
    याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, अतिरिक्त  सचिव भाऊसाहेब कांबळे, उप सचिव अशोक मोहिते, अवर सचिव नागनाथ थिटे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यासह पुतळ्यास गुलाब पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
 
Top